|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » आज होणार शशिकला यांच्या भवितव्याचा फैसला

आज होणार शशिकला यांच्या भवितव्याचा फैसला 

ऑनलाईन टीम / तामिळनाडू :

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या उत्तराधिकारी आणि अण्णद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्हि . के. शशिकला यांच्या भवितव्याचा मंगळवारी फैसला होणार आहे. शशिकला यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. याप्रकरणात शशिकला या सहआरोपी आहेत.

न्यायालयाने आज शशिकला यांना दोषी ठरवल्यास अण्णाद्रमुकची स्वतःकडे ठेवण्याचा पनीरसेल्वम यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, शशिकला या सगळय़ातून निर्दोष सुटल्यास तामिळनाडूच्या मुख्यमंत्रपदावरील त्यांची दावेदारी आणखी भक्कम होईल. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पी.सी. घोसे आणि न्यायमूर्ती अमिताव रॉय यांच्या खंडपीठाकडून थोडय़ाचवेळात या निकालाची सुनावणी केली जाईल. कर्नाटक सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दोन्ही न्यायामूर्ती स्वतंत्रपणे निकाल देतील. तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अण्णद्रमुकच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता आणि अन्य दोनजण आरोपी आहेत.

Related posts: