|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षाची शिक्षा

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षाची शिक्षा 

ऑनलाईन टीम / तामिळनाडू :

अण्णद्रमुकच्या महासचिव शशिकला यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने त्यांना दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाची सूत्रे स्वतःकडे ठेवण्याचा पनीरसेल्वम यांचा मार्ग मोकळा झाल्याचा दिसून येत आहे.

तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अण्णद्रमुकच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता आणि अन्य दोनजण आरोपी आहेत. याप्रकरणात शशिकला सहआरोपी होत्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पी.सी. घोसे आणि न्यायमूर्ती अमिताव रॉय यांच्या खंडपीठाकडून या निकालाची सुनावणी करण्यात आली. कर्नाटक सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दोन्ही न्यायामूर्ती स्वतंत्रपणे निकाल देत शशिकला यांना याप्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

 

 

Related posts: