|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » भारत पाक सिमेवर आढळला बोगदा

भारत पाक सिमेवर आढळला बोगदा 

ऑनलाईन टीम / जम्मू – काश्मीर:

जम्मू काश्मीरमधील सांबातील रामगड सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाला एक बोगदा आढळून आला आहे. सीमा सुरक्षा दलाला आढळलेला बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असल्याने घुसखोरांना भारतात प्रवेश करता यावा, यासाठी हा बोगदा तयार करण्यात आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलाच्या पथकाकडून याचा तपास करण्यात येणार आहे.

मंगळवारी बंदिपोराती हजिनमध्य लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. मात्र भारताने तीन जवान गमावले. एनआयए या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हाजिनमध्ये सोमवारी रात्रीपासूनच चकमक सुरू होती. हाजिनमध्ये पराय मोहल्ला चकमक सुरू झाल्यावर रिकामा करण्यात आला. यानंतर लष्कराच्या जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. या दरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरूवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले.

Related posts: