|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा

हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा 

स्टेंटच्या किमतीत 85 टक्क्मयांपर्यंत घट   केंद्र सरकारचा पुढाकार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने कॉरनरी स्टेंटच्या किंमतीत 85 टक्क्यांपर्यंत घट केली आहे. आता याच्या हिशेबाने धातूचा स्टेंट 7260 रुपयांमध्ये आणि ड्रग इल्यूट स्टेंटची किंमत 29600 रुपये असेल.

नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीने एक अधिसूचना जारी करत याची माहिती दिली. जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याद्वारे स्टेंटच्या किमती सरकारने निर्धारित केल्याचे म्हटले गेले. स्टेंटचे काम कोणत्याही रुग्णाची धमनी प्रवाहित ठेवणे असते. ज्या धमनीत अडथळा असतो, त्यात स्टेंट बसवून ती रुंद केली जाते आणि याद्वारे रक्ताचा प्रवाह विनाअडथळा सुरू राहतो. याची सर्वाधिक गरज बायपास शस्त्रक्रिया आणि मूत्रपिंडांशी संबधित समस्यांमध्ये भासते.

वर्तमान काळात स्टेंटची किंमत 25 हजार रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंत आहे. एनपीपीएवरील वर्तमान माहितीनुसार रुग्णालयांकडून स्टेंटमध्येच सर्वाधिक नफा कमविला जात होता, ज्यात त्यांचे मार्जिन जवळपास 654 टक्क्यांपर्यंत असतो.

एनपीपीएने आपल्या या निर्णयासाठी काही तर्क देखील दिले आहेत. यानुसार कॉरनरी स्टेंटच्या पुरवठा साखळीत वेगवेगळ्या पातळ्यांवर अनैतिक पद्धतीने किंमत वाढविली जाते. यामुळे रुग्णांना मोठे आर्थिक नुकसान झेलावे लागते.

हे चित्र पाहता जनतेच्या हितासाठी कॉरनरी स्टेंटची किंमत निश्चित करणे आवश्यक ठरते असे सरकारकडून म्हटले गेले. सरकारने कॉरनरी स्टेंटला जुलै 2016 मध्ये आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत सामील केले. तर डिसेंबर 2016 मध्ये याचा ड्रग प्राईस कंट्रोल आदेश 2013 मध्ये समावेश करण्यात आला.

Related posts: