|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाजारपेठेतील मातीचे ढिगारे हटविण्याकडे दुर्लक्ष

बाजारपेठेतील मातीचे ढिगारे हटविण्याकडे दुर्लक्ष 

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिकेच्यावतीने नरगुंदकर भावे चौक ते झेंडा चौकदरम्यानच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर येथील मातीचे ढिगारे हटविण्यात आले नाही. भाजी मंडई असल्याने भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची वर्दळ मोठयाप्रमाणात असते. यामुळे  वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील विविध रस्त्याचे रूंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर मातीचे ढिगारे आणि अर्धवट राहिलेले गटारीचे बांधकाम पुर्ण करण्याकडे महापालिकेच्या कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले आहे. बाजारपेठेतील काही रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये रविवार पेठ आणि नरगुंदकर भावे चौक ते झेंडा चौकपर्यतच्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून कॉक्रीटीकरणाचे काम वेळेत पुर्ण केले आहे. यामुळे वाहनधारकांना आणि भाजी विपेत्यांना सोईचे झाले आहे. पण येथील मातीचे ढिगारे हटविण्यात आले नसल्याने नागरिकांना गैरसोयीचे बनले आहे. हा परिसर भाजीमंडईचा असल्याने नागरिक आणि वाहनधारकांची  वर्दळ मोठया प्रमाणात असते. पण झेंडा चौक आणि नरगुंदकर भावे चौक अशा परिसरातील कॉक्रीटचे आणि मातीचे ढिगारे हटविण्यात आले नसल्याने वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. व्यापाऱयांनादेखील याचा फटका बसत आहे. मातीच्या ढिगाऱयामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून मातीचे ढिगारे हटविण्याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष झाले आहे. यामुळे येथील मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी होत आहे.

Related posts: