|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » शशिकला अखेर बंगळुरु तुरुंगात

शशिकला अखेर बंगळुरु तुरुंगात 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला आज बंगळुरु तुरुंगात शरण आल्या आहेत.

शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना 4 वर्षांची शिक्षा आणि 10 वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना 3-4 आठवडे मुदत मिळावी, यासाठी शशिकला यांच्या वकीलाने न्यायालयाला विनंती केली. मात्र, न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली. तसेच त्यांना त्वरीत न्यायालयाला शरण जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर शशिकला या बंगळुरु तुरुंगात शरण आल्या.

दरम्यान, न्यायालयाला शरण येण्यापूर्वी शशिकला यांनी जयललिता यांचे स्मारक आणि पक्षाचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या ‘रामपुरम’ या निवासस्थानी भेट दिली. तसेच मरीन बीचवरील जयललिता यांच्या स्मारकावरही पुष्पांजली अर्पण केली.

Related posts: