|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » वाट कसली बघताय; पाठिंबा काढा!

वाट कसली बघताय; पाठिंबा काढा! 

अजून कुठल्या अपमानासाठी थांबलायत : राज यांचा उद्धव यांना टोला

पुणे / प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्याकडे ढुंकूनही पाहतनसतील, तर अजून कोणत्या अपमानासाठी सेना सत्तेला चिकटून आहे? वाट कसली पाहताय, आता पाठिंबा काढाच, अशा शब्दांत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गुरुवारी तोफ डागली.

पुणे मनपातील मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राज बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना व भाजपात जोरदार भांडणे सुरू आहेत. लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा व मूर्ख बनविण्याचा हा धंदा आहे. भाजपाकडून सेनेचा उल्लेख खंडणीखोर असा केला जात आहे. तर सेनेकडून गुंडांचा पक्ष, अशा शब्दांत भाजपाचे वाभाडे काढण्यात येत आहे. तसे असेल, तर दोघे एकमेकांची धरपकड का करीत नाही? खरेतर याचा लोकांशी काय संबंध, हे कळत नाही. आघाडी आणि युती यात काहीही फरक नाही. एकाला झाकून दुसऱयाला बाहेर काढावे, अशातला सारा प्रकार आहे. शिवसेना अजून कोणत्या अपमानाची वाट पाहत आहे, कोण जाणे? शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र, त्या वेळी मोदींनी उद्धव यांच्याकडे साधे ढुंकून पाहिले नाही. तरीदेखील सत्तेला चिकटून राहण्यात सेना धन्यता मानत आहे. पैसा, सत्ता यासाठीच हा खेळ सुरू आहे. मात्र, स्वाभिमान असेल, तर सेनेने सरकारमधून बाहेर पाडावे, असे आव्हान त्यांनी दिले.

भाजपात बिल्डरमार्फत तिकिटे : राज यांचा टोला

नाशिकमध्ये सेना व भाजपाने तब्बल 77 गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱयांना तिकिटे दिली आहेत. अशी माणसे निवडून येणार असतील, तर शहरांचे काय होणार, याचा विचार केला पाहिजे. पुण्यातील बिल्डर तिकिटे कुणाला द्यायची, हे ठरवत असेल, तर भाजपाचा आलेख किती खाली येत आहे, हे समजू शकेल, असा टोलाही राज यांनी या वेळी लगावला. या वेळी राज यांनी नाशिक व पुण्यातील नगरसेवकांच्या कामगिरीचाही आढावा घेतला.

Related posts: