|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भोसे पाटी येथे अपघात : 2 ठार 2 जखमी

भोसे पाटी येथे अपघात : 2 ठार 2 जखमी 

पंढरपूर / प्रतिनिधी

तालुक्यातील भोसे पाटी येथे द्राक्ष वाहतुक करणारा टेम्पो , रस्त्यावर बुधवारी पलटी झाल्याने दोन ठार तर दोन जखमी झाल्यांची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की , ज्योतिराम गणपत गायकवाड , व अभिजीत विश्वनाथ झिरपे , अशी अपघातात ठार झालेल्या व्दयींची नावे आहेत. तसेच प्रविण बाळू नामदे , व हणमंत मोहन आदलिंगे , हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पंढरपूर – टेंभुर्णी मार्गावर भोसे पाटी येथे सदरचा अपघात घडला आहे. यामधे शेडवर बेदाणा टाकून बंदाणा तयार करणसाठी फ्gढलचिंचोंली येथे कच्ची दाक्षे टेम्पोत ( एम.एच.13 एके 1906)  भरून करंकब येथे आणली जात होती. यामधे वाहनामधील जादा वजनामुळे चालकांचा ताबा सुटून हा टेम्पो रस्त्यांच्या कडेलाच जोरात पलटी झाला. यामधे द्राक्षे अस्ताव्यस्त पडली गेली आणि यामधेच ज्यातिराम गायकवाड आणि अभिजीत झिरपे यांचा मृत्यू झाला आहे.

   सदरचा अपघात घडल्यानंतर प्रविण नामदे , हणमंत आदलिंगे या व्दयींना पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात तात्काळ उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत करकंब पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.