|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » दोन हजारांच्या नोटांची छपाई रघुराम राजन यांच्या काळातच

दोन हजारांच्या नोटांची छपाई रघुराम राजन यांच्या काळातच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटा रद्द करून नव्याने चलनात आणलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटेची छपाई ही रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याच काळात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन हजरांच्या नोटांवर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असली तरी त्या राजन यांच्याच काळात छापल्या होत्या, असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सरकारकडून गव्हर्नरपदासाठी उर्जित पटेला यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याच्या दुसऱया दिवसापासूनच हे काम हाती घेण्यात आले होते. या नोटांची छपाई करण्यात आलेल्या दोन छपाईखान्यांतील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हजाराच्या नोटा छापण्याचा पहिल्या टप्प्याची सुरूवात 22 ऑगस्टपासून करण्यात आली, मात्र, रघुराम राजन यांनी 4 स्पटेंबरला गव्हर्नरपदाचा पदभार सोडला होता. त्यामुळे नोटांवर राजन यांनी स्वाक्षरी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

Related posts: