|Saturday, December 7, 2019
You are here: Home » Top News » भाजपा-शिवसेनेला जनताच औकात दाखवेल : राधाकृष्ण विखे-पाटील यांचा टोला

भाजपा-शिवसेनेला जनताच औकात दाखवेल : राधाकृष्ण विखे-पाटील यांचा टोला 

पुणे / प्रतिनिधी:

परस्परांची औकात काढून केवळ बनवाबनवीचे काम करणाऱया भाजपा-शिवसेनेला आता जनताच औकात दाखवेल. येत्या 23 तारखेला मतदानयंत्रातून सरकारविरोधातील रोष पाहायला मिळेल, असे भाकीत काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेत्1ाs राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत वर्तविले. सेना-भाजपाचा मांडवलीचा धंदाच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पुण्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असता त्यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वार्थाने वेगळय़ा म्हणाव्या लागतील. मी 25 वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, राजकारणात प्रचाराचा स्तर आत्ताइतका कधीच खालावला नव्हता. शिवसेना व भाजपासारखे पक्ष एकमेकाची औकात काढत आहेत. दोन्ही पक्षांकडे कोणताही अजेंडा वा व्हिजन नाही. त्यामुळे जनताच त्यांना 23 तारखेला औकात दाखवेल. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले, दुसऱया टप्प्याचे मतदान 21 ला आहे. एकूणच राज्यातील चित्र पाहता भाजपाची पीछेहाट होणार, हे निश्चित आहे. केंद्र व राज्य सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. तो नक्कीच मतदानयंत्रातून व्यक्त होईल. या निवडणुकीत काँग्रेसची सरशी होईल. मुख्यमंत्र्यांनी घसा फोडून घोषणा करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्याची फळे त्यांना मिळतील.

पारदर्शकतेची चर्चा करणाऱया भाजपाने पक्षात गुंडांना प्रवेश देण्याचा सपाटाच लावला आहे. नाशकात पोलिसाची हत्या करणाऱयाला गुंडालाही त्यांनी पक्षात पावन करून घेतले आहे. राज्यातील गुन्हेगारीही वाढत आहे. एकीकडे गुंडांना प्रवेश द्यायचा, सिंहगडावर शपथ घ्यायला जाताना पावती न घेता फुकटची स्वारी करायची, ही कसली पारदर्शकता, असा सवाल करीत ते म्हणाले, उद्धव व मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी सुरू आहे. एकमेकांना खंडणीखोर वा गुंडाची उपमा देणारे हे पक्ष मतलबी राजकारण करीत आहेत. उद्धव ठाकरे हे पाठिंबा काढणार, असे म्हणत आहेत. मागेही सेनेच्या मंत्रिमहोदयांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. अशी नाटकबाजी करण्यापेक्षा सेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे अथवा राज्यपाल्यांकडे राजीनामा द्यावा. आत्मसन्मान असेल, तर सेनेने बाहेर पडावे. मांडवलीचा धंदा कामाचा नाही.

Related posts: