|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा नाही : सर्वोच्च न्यायालय

‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा नाही : सर्वोच्च न्यायालय 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून वाजवले जावे, अशी मागणी करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. कायद्यात राष्ट्रीय गीत अशी संकल्पनाच अस्तिवात नाही. त्यामुळे ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीत घोषित करून ते वाजवण्याचे आदेश देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले .

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा आणि संविधानातील तरतुदींचा दाखला देत ही याचिका फेटाळून लावली. संविधानातील 51 ए या कलमात केवळ राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचाच उल्लेख आहे. या कलमात राष्ट्रीय गीतासंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही वादाला आमंत्रण देऊ इच्छित नाही, असे न्यायमूर्ती आर. बानूमथी व न्यायमूर्ती मोहन एम, शेंतागौडार यांनी म्हटले. तसेच या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची कार्यालये, न्यायालये, विधिमंडळ आणि संसदेत राष्ट्रगीत वाजविण्याची मागणीही फेटाळून लावली. मात्र,शाळांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती करण्याज्या विनंतीचा विचार करू असे न्यायालयाने सांगितले.

Related posts: