|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » तामिळनाडूच्या विधानसभेत राडा

तामिळनाडूच्या विधानसभेत राडा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

तामिळनाडूच्या राजकरणात पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यात गेल्या काही दिवसात सुरू असलेला सत्तासंघर्ष आाज विधानसभेत शिगेला पोहोचला आहे. शशिकला गटाचे मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी यांच्या विश्वासदर्शक ठरावावरील मतदानापूर्वी विधानसभेत जोरदार राडा झाला. खुर्च्यांची फेकाफेकी आणि अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली.

शशिकला समर्थक आमदार वगळता अन्य सर्व विरोधी पक्ष आमदारांनी गुप्त मतदानाची मागणी केली. ती अध्यक्षांनी फेटाळून लावल्यानंतर हा प्रकार घडला. डिव्हीजन व्होटिंगच्या माध्यमातून मतदान घेण्याची अध्यक्ष पी. धनपाल यांची भूमिका होती. मात्र गोंधळ घालत द्रमुक आमदार अध्यक्षांपर्यंत पोहोचले आणि गुप्त मतदानाची मागणी करत कागद फाडू लागले. त्यांनी सभागृहातल्या खुर्च्या फेकल्या आणि माईकही तोडले. आमदार कुका सेल्वम तर विरोध करत अध्यक्षांच्या खुर्चावर जाऊन बसले, तर विधानसभेचे सचिव एएमपी जमालुद्दिन यांची खुर्ची मोडली.

Related posts: