|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरात 46 हजाराची दारू जप्त

शहरात 46 हजाराची दारू जप्त 

सातारा :

शहरात दोन विविध ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 46 हजार रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली.

शहरात रात्री जुनी मंडई रविवार पेठ येथे तर दुपारी साडेतीन वाजता बॉम्बे रेस्टॉरंट येथील मोरया हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून निघालेल्या दोघांना पकडून पोलिसांनी दारू जप्त केली.

रविवार पेठेतील अजय चंद्रकांत घाडगे यांच्या घरावर रात्री गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला यामध्ये 17 हजार रूपये किंमतीची 326 देशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या तर दुपारी खबऱयाकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा लावला. यामध्ये समाधान चवरे, शेख, इस्ते, फडतरे व काटकर या पोलिसांनी सहभाग घेतला.

यावेळी मोरया हॉस्पिटलसमोरून दुचाकीवरून निघालेल्या किरण गुलाब  जाधव व प्रकाश राजगिरे (रा. संगमनगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून दुर्गन कंपनीच्या दारूच्या 12 बाटल्या, डीएसपी कंपीनच्या 10 बाटल्या व डीएसपी स्पेशल कंपनीच्या 10 बाटल्या अशा एकूण 4 हजार 220 रूपयांची दारू जप्त केली तसेच ही दारू ज्या  स्कुटी ऍक्टीव्हा दुचाकीवरून नेली जात होती. ती गाडी 25 हजार रूपयांची असा एकूण 29 हजार 220 रूपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला.

11 लाख 23 हजाराची दारू जप्त

आचारसंहिता कालावधीत  उत्पादन शुल्क विभागाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात 111 केसेस केल्या असून 66 जणांना अटक केली. 17 वाहने जप्त केली. यात 11 लाख 23 हजार 774 ची दारू जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षका श्रीकर यांनी दिली.

Related posts: