|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रुदेश्वर देवस्थानवर मामलेदारांची बळजबरी

रुदेश्वर देवस्थानवर मामलेदारांची बळजबरी 

प्रतिनिधी/ सांखळी

सांखळी मतदारसंघातील हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानात महाशिवरात्री उत्सवावेळीच सरकार आणि देवस्थान विषयी डिचोली मामलेदार बळजबरी करत असून ते नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप देवस्थान समितीने भंडारी समाज कार्यकर्ते यांच्या सांखळी भूमिका सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. डिचोली मामलेदारांविरूद्ध न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

शुक्रवारी हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानच्या कार्यालयाला संबंधित सरकारी अधिकाऱयाने बळजबरीने टाळे तोडले. याची पूर्वसूचना दिली नव्हती. दोन दिवसापूर्वी बेकायदेशीरित्या संबंधित अधिकाऱयांनी देवस्थानला एक पत्र दिले होते. त्यात सर्व संबंधित वह्या, कागदपत्रे, चाव्या आपल्या स्वाधीन करा, असे लिहिले होते. मात्र देवस्थान समितीला न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सरकारी अधिकाऱयांनी फक्त समितीच्या सहकार्याने संबंधित विषय हाताळायचे होते. शुक्रवारी संबंधित अधिकाऱयाने मात्र कार्यालयाचे टाळे तोडले. 48 तासही ते थांबू शकले नाहीत. यामुळे या अधिकाऱयांवर दबाव आहे का? हे समजते कठीण आहे.

अधिकाऱयांनी केलेल्या या कृतीबद्दल देवस्थानने नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसात रितसर तक्रारही केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. रुद्रेश्वर देवस्थान व न्यायालयावर आमचा विश्वास असल्याचे ते म्हणाल. मामलेदार नार्वेकर यांच्याकडून सतावणूक होत आहे. ते कोणाच्यातरी दबावाखाली वावरत असावेत, असे वाटते. त्यांची योग्य ती चौकशी करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. नाहीतर जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

देवस्थानात 24 रोजी शिवरात्र उत्सव

शनिवारी झालेल्या देवस्थान व भंडारी समाज बांधवांच्या खास बैठकीत 24 रोजी होणाऱया शिवरात्र उत्सवाची रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी अधिकाऱयांकडून झालेल्या या कृतीचा निषेध करण्यात आला. न्यायालयाच्या नियमानुसारच देवस्थानचे महाजन कार्य करत असून सरकारी अधिकाऱयांनी असे वागणे चुकीचे आहे. दबावाला बळी पडून त्यांनी भंडारी समाज बांधवांना आव्हान देऊ नये, असे ते म्हणाले. सुभाष किनळकर, दीपक नाईक, छत्रुग्घ पेडणेकर, संगेश कुंडईकर व समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

Related posts: