|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जावलीकरांची राष्ट्रवादीकडून क्रूर थट्टा

जावलीकरांची राष्ट्रवादीकडून क्रूर थट्टा 

प्रतिनिधी/ कुडाळ

राष्ट्रवादी काँग्रेसने जावली 9 ठिकाणी कोटय़धिश लोकांना उमेदवारी दिली आहे. पैसेवाली, गुंडगिरी करणारी, चारित्रहीन अशा लोकांना पैशाचा धंदा करून तिकीट वाटप केली आहेत. सर्वसामान्य जनतेची क्रूर थट्टा केली आहे. गुंडागिरी, दहशत माजवणाऱया राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जावलीचा स्वाभिमान काय असतो ते दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन दीपक पवार यांनी कुडाळ येथील भाजपच्या सांगता सभेत बोलत होते.

यावेळी सुधीर पवार, म्हसवे गटाचे यशवंत पवार, कुडाळ पंचायत समितीचे उमेदवार संजय शिंदे, दादा रासकर, दत्ता रासकर, पवार, काशीनाथ धनावडे,  आदी भाजपचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दीपक पवार म्हणाले, जावली तालुक्यासाठी मनापासून तन-मन-धन अर्पण मी करून झटत आहे. आमदारकीच्या निवडणुकीत सातारा शहराने मला ताकद दिली दिली. मात्र जावलीने मला ताकद दिली नाही, याची खंत आहे. मात्र आता जावलीच्या जनतेला कळून चुकले आहे. यावेळी नक्की आमदारकीची मतदानाची कसर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भरून काढणार, असा मला विश्वास आहे.

जावली तालुका पंचायत समिती भाजपच्या एकदा ताब्यात द्या, केंदात, राज्यात भाजपची सरकार आहे. जावली तालुक्यात विकासाची गंगाच काय तर विकासाचा महासागर वाहून आणतो फक्त एकदा संधी देऊन मला तुमच्या ऋणात राहू द्या.

यावेळी दीपक पवार पुढे म्हणाले, जावली तालुका 17 कोंटींचा निधी मी दिला आहे. आगामी काळात कोणत्याही पक्षापुढे आता जावली तालुक्याला हात पसरायची गरज नाही. या तालुक्यातील मातीतला सुपुत्र आहे असे सांगून भाजप पक्षाला यावेळी संधी देण्याचे आवाहन ही पवार यांनी  केले.

तर सुधीर पवार यांनी जावली तालुक्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कुडाळ गटातील उमेदवारांचा खरपुस समाचार घेतला महिलांशी असभ्य वर्तन करणारा उमेदवार हा कुडाळ गटाला राष्ट्रवादीने दिला आहे. राष्ट्रवादीला असा उमेदवार कसा काय चालतो. कुडाळकरांनो आता चारित्र्यहीन व्यक्तीला मतदान करून कुडाळचे पावित्र्य भंग करू नका राष्ट्रवादीतले विद्यमान आमदार हे माळा माळाने पैसे वाटत सुटले आहे. त्यांच्या पायाखाली वाळू सरकू लागली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये 9 जागा भाजप यावेळी मिळवणार असा खात्रीलायक विश्वास सुधीर पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी पंचायत समितीचे संजय शिंदे उमेदवारांनी आपले भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर साधना कदम भाषणे केली. दादा रासकर यांनी आभार व्यक्त केले.

Related posts: