|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राजधानीत झाला ‘शिवोत्सव’

राजधानीत झाला ‘शिवोत्सव’ 

प्रतिनिधी/ सातारा

जय भवानी…जय शिवाजी… अशा जयघोषात ढोल ताश्यांच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या व त्यांची महती सांगणाऱया गडकोटवरुन शहरासह जिल्हय़ातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवदौडीने आणलेला शिवज्योत दिवसभर तेवत ठेवून शिवजयंती मोठय़ा दिमाखदार सोहळय़ाने साजरी करण्यात आली. साताऱयात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वशंज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 साताऱयातील रविवार पेठेतील चार मंडळांनी, तसेच केसरकर पेठेतील गणेशोत्सव मंडळ, शकुनी गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठेतील शंकर पार्वती गणेशोत्सव मंडळ, सोन्या मारुती मंडळ, फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले भाजी मंडईतील मंडईचा राजा, हिंदु समाज खाटीक संघटना, सोमवार पेठेतील शिवजयंती उत्सव मंडळ, मल्हारपेठेतील योध्दा ग्रुप या विविध मंडळांनी चौका-चौकात भगव्या पताका लावून वातावरण भगवेमय केले होते. शहरात विविध मंडळांनी विविध सामाजिक उपक्रमही राबविले होते.

 संभाजी ब्रिगेड साताराच्यावीने शिवतीर्थावर श्री. छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गितांजली विद्यामंदीर येथे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब डेरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष रफिक शेख, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सी. आर. बर्गे, दिपक चोरगे, सदाशिव जाधव, वामन जाधव, बाजीराव देशमुख, युवराज पवार, मयुर आंबवले, दिपक क्षीरसागर, दिपक ढाणे, शिवाजी जाधव, सागर चोरगे, रोहित घंगेकर, शुभम राऊत, उमर शेख, सोमनाथ यादव, अनुप गांगुर्डे, प्रदीप चोरगे, सुरज चव्हाण, तेजस घोरपडे, मोमिन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार नेताजी कुंभारे, विवेक जाधव हे अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

                                                                                

Related posts: