|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » माडेलची खोर्ली इलेव्हनवर 8 विकेट्सनी मात;नाहुषची चमक

माडेलची खोर्ली इलेव्हनवर 8 विकेट्सनी मात;नाहुषची चमक 

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

खोर्ली इलेव्हन संघाचा 8 विकेट्सनी पराभव करून माडेल युवक संघाने गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या उत्तर गोवा अ विभाग क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय नोंदविला.

काल हा सामना गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी क्रिकेट अकादमीवर खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना खोर्ली इलेव्हनने आपल्या डावात केवळ 154 धावा जमविल्या. त्यांच्या केवळ नाहुष जाधवने एकाकी लढत देत 72 चेंडूत 7 चौकारांनी सर्वोच्च 60 धावा जमविल्या.

त्यानंतर माडेल युवक संघाने 31 षटकांत 2 बाद 158 धावा करून सहज विजय प्राप्त केला. त्यांच्या सूरज शिंदे, आनंद अभिशेठ व प्रजेश बांदोडकरने उपयुक्त खेळी केल्या.

संक्षिप्त धावफलक: खोर्ली इलेव्हन, 37.2 षटकांत सर्व बाद 154 (नाहुष जाधव 60, राजदीप 14, सौरभ धावजेंकर 10 धावा. सागर मापूसकर 2-16, मुरली तळेंकर 2-16, आनंद अभिशेठ 2-36, बसू गौडर 2-36, नीतेश जयस्वाल 1-27) पराभूत वि. माडेल युवक संघ, 31 षटकांत 2 बाद 158 (सुरज शिंदे नाबाद 44, आनंद अभिशेठ 40, प्रजेश बांदोडकर नाबाद 40, धनंजय राणे 25 धावा. रायन फर्नांडिस 2-21).

Related posts: