|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये भाटीकरचा 9 विकेट्सनी विजय

जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये भाटीकरचा 9 विकेट्सनी विजय 

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

केपे तालुका विजेता न्यू एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटचा 9 विकेट्सनी सहज पराभव करून भाटीकर मॉडेल हायस्कूलने क्रीडा व युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या 17 वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एकतर्फी विजयाची नोंद केली.

भाटीकर मॉडेलच्या विजयात ओंकार देशभंडारीने मोलाचा वाटा उचलताना अर्धशतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना न्यू एज्युकेशनलने आपल्या डावात 20 षटकांत 9 बाद 107 धावा केल्या. त्यांच्या अजय शर्माने 29 तर विश्वयने 24 धावा केल्या.

भाटीकरसाठी अनीश माड्डोळकर व एच. टी. गणेशने प्रत्येकी 2 तर सुभव बोरकरने 1 गडी बाद केला. उत्तरादाखल भाटीकर मॉडेलने ओंकारच्या नाबाद 55 व गणेशच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर विजय सोपा केला.

Related posts: