|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळीत दोन किलो सोने, सिगरेटस् जप्त

दाबोळीत दोन किलो सोने, सिगरेटस् जप्त 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर उतरलेल्या तिघा प्रवाशांकडून कस्टम विभागाच्या हवाई तज्ञ पथकाने दोन किलो सोन्यासह लाखों रूपये किमतीची विदेशी सिगरेटस् जप्त केली आहे. ही कारवाई कस्टम विभागाने रविवारी पहाटे केली. कस्टम अधिकाऱयांनी 54 लाख 28 हजार रूपये किमतीचे सोने तसेच 4 लाख 36 हजार रूपये किमतीची सिगरेटस् मिळून एकूण 58 लाख 64 हजार रूपये किमतीचा अवैध माल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघा केरळी प्रवाशांना कस्टम अधिकाऱयांनी अटक केली आहे.

   दाबोळी विमानतळावर उतरणाऱया काही प्रवाशांकडे अवैध मार्गाने भारतात आणलेला माल असल्याची माहिती कस्टम विभागाच्या हवाईतज्ञ पथकाला मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱयांनी दाबोळी विमानतळावर पाळत ठेवली होती. संशयाने केलेल्या चौकशीत तिघा हवाई प्रवाशांकडे अवैध माल सापडला. यात दोन किलो सोने व सिगरेटस्चा समावेश होता. सकाळी 4.30 ते 5 वा. च्या दरम्यान या घटना उघडकीस आल्या.

 अटक केली पण, नाव उघड केले नाही

 कस्टम विभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेचारच्या सुमारास दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका केरळी प्रवाशाकडे दोन किलो वजनाचे व 54 लाख 28 हजार रूपये किमतीचे सोने सापडले. हे सोने त्याने आपल्या बॅगेमध्येच लपवले होते. हे सोने बिस्किटांच्या स्वरूपात होते. दुबईहून हा प्रवासी गोव्यात उतरला होता. कस्टम अधिकाऱयांनी त्याच्याकडून सोने जप्त करून त्याला अटक केली आहे. मात्र, त्याचे नाव उघड केलेले नसून या प्रकरणी कस्टम विभाग अधिक तपास करीत आहे.

 या कारवाईनंतर सकाळी पाचच्या सुमारास अन्य दोघा प्रवाशांना कस्टम अधिकाऱयांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 4 लाख 36 हजारांच्या विदेशी सिगरेटस् आढळून आल्या. या सिगरेटस् अधिकाऱयांनी जप्त केल्या आहेत. हे दोघेही प्रवासी शारजाहून एअर अरेबियाच्या विमानातून दाबोळी विमानतळावर उतरले होते. दोघेही केरळातील नागरिक आहेत. कस्टम अधिकाऱयांनी त्यांच्याकडून दंड वसुल करून त्याना मुक्त केले आहे. मात्र, या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. या दोन्ही कारवाईत कस्टम विभागाने एकूण 58 लाख 64 हजार रूपये किमतीचा माल जप्त केला. तसेच दोघा केरळी प्रवाशांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटकही केली.

 

Related posts: