|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » आजपासून बचत खात्यातून आठवडय़ाला 50 हजार काढता येणार

आजपासून बचत खात्यातून आठवडय़ाला 50 हजार काढता येणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आजपासून बँक खातेधारकांना आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढणार आहे. आजपासून आठवडय़ाला पन्नास हजारांची रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी पैसे काढण्यावरील मर्यादा 24 हजारांची होती. आता ही मर्यादा पन्नास हजार करण्यात अली आहे. तसेच 13 मार्चपासून खात्यावरून पैसे काढण्यासाठी कोणतेही बंधन नसेल. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली बंधन अद्यापही कायम आहे.

निश्चलनीकरणाची प्रक्रिया संपत आली असून लवकरच अर्थिक व्यवहारांवर निर्बंध पूर्णपणे शिथील केले जातील, अशी माहिती अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी 3 फेबुवारीला दिली होती. 8 नोव्हेंबरनंतर अर्थिक व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध जवळपास शिथिल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. बँकेतील बचत खात्यातून आठवडय़ाला 24 हजार किंवा महिन्याला 96 हजार रूपये रक्क्म खूपच कमी असलयाने रिझर्व्ह बँक लवकरच हे निर्बंध उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट पेले. दरम्यान 13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधन मागे घेण्यात येतील.

Related posts: