|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » विविधा » मतदारांच्या मार्गदर्शनासाठी ‘ट्रू व्होटर’

मतदारांच्या मार्गदर्शनासाठी ‘ट्रू व्होटर’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

निवडणुकीचे पडघम वाजताच उमदेवारांची चांगलीच धावपळ होते. कमी वेळात मतदारांशी संवाद साधण्याचे एकप्रकारे आव्हानच उमेदवारांसमोर असते. याच काळात उमेदवारांची संपूर्ण माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर’ हे ऍप नुकतेच लाँच केले आहे.

voter

राज्यातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आपल्या भागात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे ‘ट्रू व्होटर’ हे नवे ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले असून हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या संबंधित उमेदवाराची संपूर्ण माहिती मिळवता येऊ शकते.