|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी उद्धव ठाकरेंची चौकशी होणार?

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी उद्धव ठाकरेंची चौकशी होणार? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई महापालिका निवडणूक मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मोठा इशारा दिला आहे. “भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत तक्रार केल्यास, त्याची चौकशी होईल’’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

“सोमय्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी काही कागदपत्र सादर पेले आहेत. या कंपन्यांमध्ये मनी लाँडरिंग झाले आहे. त्यांनी उद्धवजींना हे विचारले की याच्यांशी शिवसेनेच्या काही नेत्यांशी संबंध आहे का? असतील तर कोण आहेत? त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? यानंतर मी सोमय्यांना सांगितले, की याचा राजकीय उपयोग करू नका. तुम्ही संबंधित विभागाला ही कागदपत्र सोपवा. संबंधित यंत्रणा त्याच्यावर कारवाई करेल’ असे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सांगितले.

Related posts: