|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिवेंद्रराजेंच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

शिवेंद्रराजेंच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल 

प्रतिनिधी/ मेढा

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सहकाऱयांनी मारहाण केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी व मेढा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी शमसुद्दीन पठाण (वय.24) रा. कमाणी हौद सातारा, धंदा-ड्रायव्हर हा व त्याचा मित्र जयेश शंकरराव देशमुख यांच्या मित्राची असलेली इनोव्हा कार नं. एम.एच.14. 6677 ही गाडी घेवून पावशेवाडी (ता.जावली) येथे राहणारे आनंद पवार यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणी आनंद पवार यांचे मित्र आनंद जाधव, मंगेश पवार, ओंकार दिघे, किसन शिंदे हे सर्वजण त्याठिकाणी होते. जेवण झाल्यावर सर्वजण पावशेवाडी येथे असलेली दंडवस्ती येथील चौकात तंबाखु घेण्यासाठी थांबले असता 19 रोजी रात्री सुमारे 12.30 चे दरम्यान सातारा बाजुकडुन 7 ते 8 गाडय़ा येवून आमचे जवळ थांबल्या. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे त्यांच्या गाडीतून उतरले व फिर्यादीजवळ आले. तु कुठला आहेस विचारुन मी सातारचा आहे असे सांगताच काही कारण नसताना माझ्या कानाखाली वाजवली. त्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱया 30 ते 35 कार्यकर्त्यांनीही मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्ये पडलेल्या माझ्या सहकाऱयांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद शमसुद्दीन पठाण याने मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक नलावडे करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणावरुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घटनेची खबर मिळताच पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला व गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी जोरदार मागणी केली. दरम्यान, या प्रकारामुळे जावली तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु असुन मतदारांच्याही व कार्यकर्त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Related posts: