|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गावणे येथील सं. ययाती व देवयानी आज कला अकादमीत सादरीकरण

गावणे येथील सं. ययाती व देवयानी आज कला अकादमीत सादरीकरण 

प्रतिनिधी / फोंडा

कोनर-गावणे येथील जय शांतदा संगीत सांस्कृतीक संस्थेतर्फे संगीत ‘ययाती व देवयानी’ या नाटय़प्रयोगाचे कला अकादमी पणजीत सुरू असलेल्या स्व. तुकाराम फोंडेकर स्मृती संगीत नाटय़ महोत्सवात मंगळवार 21 रोजी मा. दिनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सायं. 7 वा. सादरीकरण होणार आहे.

वि.वि. शिरवाडकर लिखित या नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजू साईश देशपांडे यांनी सांभाळली आहे. संगीत साथ प्रदीप शिलकर व शैलेश गावकर यानी केली आहे. यात राजेंद्र नाईक, सिद्धवी नाईक, रूचा आमोणकर, विवेक नाईक, उल्हास नाईक, प्रेमानंद नाईक, मेघनाथ व सुहास नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Related posts: