|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » मतसंग्राम : राज्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मतसंग्राम : राज्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईसह राज्यात होणाऱ्या 10 महापालिका, 11 जिल्हापरिषद व 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदानाला सुरूवात झाली आहे. यापैकी मुंबई महानगरपालिका लढत सर्वात लक्षवेधक  ठरली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱयामुळे ही निवडणुक रंगतदार असणार आहे.
सकाळी साडेसातपासूनच मतदानाला सुरूवात झाली असून मतदारांची गर्दी पहायला मिळत आहे.  बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, तर सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.  पुणे शहरात 26 लाख 34 हजार असून 163 जागांसाठी एक हजार 90 उमेदवार निडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीत प्रमुख लढत आहे. पिंपरीतही दोन पक्ष आमनेसामने आहेत.

 

Related posts: