|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » हात धुतल्यावर लेगच बोटावरची शाई गायब

हात धुतल्यावर लेगच बोटावरची शाई गायब 

ऑनलाईन टीम / पुणे :

महापालिका निवडणुसाठी आज मतदानाला सुरूवात झाली असून पुणत मतदानानंतर हा धुतल्यावर शाई पुसली जात असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी सकाळपासूनच दहा महापालिका निवडणुकीसाठी मतदानाल सुरूवात झाली. मतदारांनी मतदान केंद्रावर मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. मात्र पुण्यातील शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालयामधील मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर बोटाला लावण्यात आलेली शाई , पाण्याने हात धुतला की लगेच निघुन गेल्याचे समोर आले आहे.

पुण्याच्या रहिवाशी असणाऱया प्राध्यापिका मंजुश्री जोशी यांनी आज सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यानंतर शाई लावलेली बोट दाखवत त्यांनी आपला सेल्फी काढला आणि फेसबुकवर पोस्ट केला. मात्र काही वेळानंतर त्यांनी हात धुतल्यानंतर शाई निघुन गेली. ही गोष्ट निवडणूक अधिकाऱयांच्या लक्षात आणुन देण्यासाठी मंजुश्री जोशी पुन्हा मतदान केंद्रावर गेल्या आणि तिथे असलेल्या अधिकाऱयांनी त्यांच्या बोटाला पुन्हा दुसऱया बाटलीतील शाई लावली परंतु तीही शाई हातधुतल्यानंतर निघुन गेली. त्यामुळे इथे येणाऱया मतदारांना हा अनुभव येत असल्याचे दिसून येत आहे.