|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यात आत्तापर्यंत सरासरी 31.01 टक्के मतदानाची नोंद

राज्यात आत्तापर्यंत सरासरी 31.01 टक्के मतदानाची नोंद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. राज्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 31.01 टक्के इतकी मतदानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये सर्वाधिक मतदान हे ठाण्यात झाले आहे. ठाण्यात 35.11 टक्के इतकी मतदानाची नोंद झाली आहे. याचबरोबर मुंबईत 32.17 टक्के, उल्हासनगरमध्ये 24.83 टक्के, नाशिकमध्ये 30.63, पुण्यात 30.52 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 30.86, सोलापुरात 32 टक्के, अमरावतीमध्ये 31.62 टक्के, अकोल्यात 32.39 टक्के तर नागपूरात 29.95 टक्के मतदानाची नोंद दुपारी दीडपर्यंत झाली आहे. मात्र, यामध्ये इतकी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या भागात अद्यापही मतदान सुरु आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढत असल्याचे दिसत आहे.

Related posts: