|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » महापालिका मतदान संपले ; सरासरी 55 टक्के मतदानाचा अंदाज

महापालिका मतदान संपले ; सरासरी 55 टक्के मतदानाचा अंदाज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठीचे मतदान संपले असून यंदाच्या वर्षी राज्यातील मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यातील महापालिका मतदानाची टक्केवारी अंदाजे 50 ते 55 टक्क्यांवर गेली आहे.

मुंबईत सर्वाधिक अंदाजे 52.17 टक्के, अमरावतीमध्ये 51.62 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 51.86 टक्के, नाशिकमध्ये 52.63 टक्के, उल्हासनगरमध्ये 46.83 टक्के, पुण्यात 49.52 टक्के, सोलापुरात 44 टक्के, ठाण्यात 53.11 टक्के तर अकोल्यात अंदाजे 49.39 टक्के इतके मतदान झाल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत 9 हजार 208 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. याबरोबरच अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 23 फेबुवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

दरम्यान, राज्यातील मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्याप जाहीर करण्यात आली नसून मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून सायंकाळी 7 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

Related posts: