|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » देशावर पुन्हा चलनटंचाईचे सावट

देशावर पुन्हा चलनटंचाईचे सावट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

एटीएममधून पैसे काढण्यावर आता कुठलीही मर्यादा नसली तर केंद्र सरकारने आठवडय़ाला 50 हजार काढण्याच्या निर्णय दिल्यानंतर देशता पुन्हा एकदा चलनटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

रिझर्व्ह बँकेने 20 फेब्रुवारीपासून बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढवल्यानंतर केवळ दोन दिवसांतच देशात पुन्हा चलनटंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी लोकांना बँक किंवा एटीएममधून गरजेपुरते पैसे काढण्याचे आवाहान केले आहे. सध्या देशातील अनेक भागांतून एटीएम केंद्रातील पैसे संपल्याची तक्रार येत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लोकांनी त्यांना हवे तेवढेच पैसै काढावेत, गरजेपेक्षा जास्त पैसे काढल्याने इतरांना पैसे मिळत नसल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे .

Related posts: