|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग » 2017 मध्ये वेतनात 9 टक्के वृद्धी

2017 मध्ये वेतनात 9 टक्के वृद्धी 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

2017 मध्ये भारतातील कर्मचाऱयांच्या वेतनात 9.5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. एऑन हेविट या एचआर कन्सल्टन्सी फर्मने 1 हजार कंपन्यांबरोबर चर्चा करत वार्षिक वेतनवाढीचा अहवाल सादर केला आहे. 2016 च्या तुलनेत भारतीय कर्मचाऱयांच्या वेतनात कमी वाढ होईल. नोटाबंदीच्या निर्णयाने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वेतनात कमी प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. याचप्रमाणे बेक्झिटचाही परिणाम वेतनवाढीवर दिसून येईल.

2017 मध्ये भारतीय कर्मचाऱयांच्या वेतनात 9.5 टक्के वाढ होईल. 2016 मध्ये 10.2 टक्क्यांनी वेतन वाढ झाली होती. गेल्या काही वर्षांत वेतनात वाढ होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. 2007 मध्ये वेतनात 15.1 टक्क्यांनी वृद्धी झाली होती. भारतामध्ये कर्मचाऱयांचे वेतन त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते. 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये वेतनवाढीत कमी येणार आहे. नोटाबंदी आणि बेक्झिटचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येईल.

चांगली कामगिरी करणाऱया कर्मचाऱयांच्या वेतनात जास्त प्रमाणात वाढ होईल. सामान्य कर्मचाऱयांच्या तुलनेत त्यांच्या वेतनात 1.8 टक्के अधिक वाढ होईल. भारतात गेल्या चार वर्षात वेतनात वाढ कमी प्रमाणात होत आहे. भारताप्रमाणेच चीन, जपान, सिंगापूर, मलेशिया आणि फिलिपाईन्स या देशामध्येही वेतनवाढ कमी होईल असा अंदाज आहे.

Related posts: