|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » तुर्कस्तानच्या हल्ल्यात आयएसचे 56 दहशतवादी ठार

तुर्कस्तानच्या हल्ल्यात आयएसचे 56 दहशतवादी ठार 

अंकारा :

सीरियाचे अलबाब शहर आणि नजीकच्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेचे समर्थन प्राप्त लष्कराच्या हवाई हल्ल्याच्या मदतीने तुर्कस्तानच्या लष्कराने बुधवारी इस्लामिक स्टेटच्या 56 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तुर्कस्तानने याची गुरुवारी माहिती दिली आहे. लष्कराने आयएसच्या तळांवर 104 गोळे डागले आणि त्याच्या अनेक इमारती तसेच वाहनांना नष्ट केले. आघाडी लष्कराच्या हवाईहल्ल्यामंध्ये 11 दहशतवादी मारले गेले आहेत. इतर दहशतवादी गोळीबार तसेच समोरासमोरील संघर्षात ठार झाले आहेत.

सीरियाच्या अलबाब शहरात मागील काही महिन्यांपासून आयएस दहशतवाद्यांचा कब्जा आहे येथे अनेक दिवसांपासून भीषण लढाई सुरू आहे. हे शहर तुर्कस्तानच्या सीमेनजीक आहे. यामुळे तुर्कस्तानने येथील लढाईत आपली भूमिका वाढविली आहे. रक्का तसेच मोसूलमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांना पलायन करावे लागल्याने त्यांनी इतरत्र आश्रय घेण्यास प्रारंभ केला आहे. यानुसार काही दहशतवाद्यांनी तुर्कस्तानात शिरकाव केल्याचे बोलले जाते.

Related posts: