|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पोस्टल मतदान ताबडतोब रद्द करा

पोस्टल मतदान ताबडतोब रद्द करा 

प्रतिनिधी /पणजी :

गोव्यात झालेल्या 4 फेबुवारीच्या विधानसभा निवडणुकीत सेवा बजावलेल्या मतदारांसाठी सध्या चालू असलेले पोस्टल मतदान त्वरित थांबवून ते रद्द करावे आणि सर्व सेवा मतदारांचे फेरमतदान यंत्रामार्फतच एकाच दिवशी मतमोजणीपूर्वी 11 मार्च आधी घेण्यात यावे, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय बैठकीतून करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यात त्वरित पथक पाठवावे, अशी सूचनाही बैठकीतून सर्वांनी केली.

 काँग्रेस, मगो, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, गोवा विकास पक्ष, गोवा सुराज पक्ष या गोव्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित होते. भाजप, आम आदमी पक्ष (आप), गोवा सुरक्षा मंच या तीन पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्या तिन्ही पक्षांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस आणि प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी या सर्व पक्षीय बैठकीसाठी पुढाकार घेतला होता.

 निवडणूक नियमांचे उल्लंघन

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, गोव्यातील सुमारे 10 लाख लोक अर्थात मतदारांनी एकाच दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारीला मतदान केले. मात्र त्यावेळी सेवा बजावलेले सुमारे 17500 मतदारांसाठी 35 दिवसांचा अवधी देणे हे सर्वस्वी शंका आणि कुशंका निर्माण करणारे आहे. सेवा मतदारांना ज्यावेळी प्रशिक्षण देण्यात येते त्याचवेळी सेवा केंद्रांची (फॅसिलिटेशन सेंटर) स्थापना करुन 4 फेब्रुवारीपूर्वी त्यांचे पोस्टल मतदान घेणे आवश्यक होते. निवडणूक आयोगाचा तसा नियमच आहे, परंतु तो नियम सेवा मतदारांसाठी गोव्यात पाळण्यात आला नाही. त्यांना कोणत्या नियमाखाली 35 दिवसांची मुदत दिली? असा प्रश्नही चोडणकर यांनी उपस्थित केला.

Related posts: