|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सालेलीची शांती बिघडू देऊ नका

सालेलीची शांती बिघडू देऊ नका 

प्रतिनिधी /वाळपई :

शाणू गावकर यांच्या बेपत्ता प्रकरणाला काही व्यक्ती वेगळे वळण देऊन गावाचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच गावकर यांच्या खुनाचा आरोप ज्याच्यावर होत आहे त्यांची चौकशी व्हावी. सरकारने अजय आरदाळकर याच्या माहितीवरुन जरुर चौकशी करावी, मात्र यातून गावातील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन सालेली गावातील नागरिकांनी काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

गावात गेल्या 11 वर्षापासून शांतता आहे. त्यावेळी गावात घडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर वातावरण पूर्णपणे दूषित बनले होते, मात्र त्यानंतर गावातील नागरिकांची एकजुट व परस्परांना मदत करण्याच्या कार्यातून गावाची स्थिती आता पूर्वपदावर आली आहे. मात्र आताच शाणू गावकर यांच्या खुनाचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने कामाला लागले आहे, यातून गावात पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटला आहे, कारण अजय आरदाळकर यांनी आपल्या माहितीत दिलेल्यांना पोलीस स्थानकावर आणून तासन्तास ठेवल्याने गावात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. पोलिसांनी यासंबंधी निश्चितपणे चौकशी करावी, मात्र चौकशीच्या प्रक्रियेचा फटका गावाच्या वातावरणावर होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासंबंधी गावातील नागरिकांची एक महत्त्वाची बैठक होऊन बेपत्ता शाणु गावकर यांच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना गावकऱयांनी सांगितले की, अशा स्वरुपाची गावाची कोणतीही बैठक झालेली नाही. सर्व ग्रामस्थ व विश्वजित कृ. राणे यांच्यादरम्यान आजही चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर शाणू गावकर यांच्या कुटुंबियांना गावाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या बेपत्तासंबंधी जशी मागणी 11 वर्षापूर्वी करण्यात आली होती ती मागणी आजही कायम आहे, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. 11 वर्षापूर्वी घडलेल्या आंदोलनातून गावाची शांतता पूर्णपणे बिघडलेली होती त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: