|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला अकादमीमध्ये ‘झूमइन’च्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

कला अकादमीमध्ये ‘झूमइन’च्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद 

प्रतिनिधी /पणजी :

येथील कला अकादमीच्या आर्ट गॅलरीमध्ये बुधवार 22 रोजीपासून सुरू झालेल्या तृतीय ‘एफआयपी ग्रॅन्ड इंटरनॅशनल सर्किट फोटो एक्झिबिशन’ या ‘झूमइन फोटोग्राफर्स क्लब’ या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकार संघटनेच्या छायाचित्र प्रदर्शनाला छायाचित्रप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बुधवारी सकाळी 10.30 वाजता उद्घाटन झाल्यापासून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसामान्य नागरीक तसेच कलाप्रेमी रसिकांनी या छायाचित्र प्रदर्शनाच्या ठिकाणी मोठय़ा संख्येने भेट देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांच्या छायाकृतींचा आस्वाद घेतला.  

 

झूमइन फोटोग्राफर्स क्लब या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांच्या संघटनेतर्फे गोव्यात आयोजित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलेच छायाचित्र प्रदर्शन आहे. यापुर्वी देशाच्या इतर भागांमध्ये अशा प्रकारची दोन आंतरराष्ट्रीय प्रदर्शने भरविण्यात आलेली आहेत व गोव्यात असे प्रदर्शन भरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिरामार सर्कल येथे राहणारे गोव्यातील उद्योजक व छायाचित्रकार धीरजलाल दामोदर यांच्याहस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे बुधवार 22 रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन झाले. गेल्या दोन दिवसांपासून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक व युवती तसेच प्रौढ छायाचित्रप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली असून चांगल्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे. 

Related posts: