|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » मोदी गाढवासारखे काम करतात ; दिग्विजयसिंहांचे वादग्रस्त वक्तव्य

मोदी गाढवासारखे काम करतात ; दिग्विजयसिंहांचे वादग्रस्त वक्तव्य 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मोदीजी खरे बोलतात, ते खरंच गाढवाप्रमाणे काम करत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना गुजरातचे सदिच्छा दूत म्हणून काम करु नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी अखिलेश यांनी गाढवाचा उल्लेख केला होता. ‘बच्चन यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार करु नये’ असे अखिलेश म्हणाले होते. त्यानंतर आता दिग्विजयसिंह यांनी हे वक्तव्य केले आहे.