|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नायकवडी कुटुंबियांवर खोटे गुन्हे नोंद करणाऱयांवर कारवाई करा : वैभव नायकवडी

नायकवडी कुटुंबियांवर खोटे गुन्हे नोंद करणाऱयांवर कारवाई करा : वैभव नायकवडी 

वार्ताहर/ वाळवा

गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी वाळवा येथे झालेल्या गोळीबारामध्ये वाळवा येथील नायकवडी कुटुंबियांची नावे टाकून खोटा गुन्हा पोलिसांत नेंद करायला लावणाऱया  कुटील कारस्थानी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. व सरपंच गौरव नायकवडी, किरणदादा नायकवडी, अभिजीत व केदार नायकवडी आणि अन्य हुतात्मा संकुलाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे पोलिसांनी मागे घ्यावेत, खरे गुन्हेगार, रिव्हाल्वर सर्व बाबी तपासून घटनेला जबाबदर असलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करावेत अन्यथा वाळवा तालुक्यातील रयतविकास आघाडी व हुतात्मा संकुलातील वाळव्यातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशारा क्रांतीविकास आघाडी व रयत विकास आघाडीचे नेते वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

वैभव नायकवडी यांनी शुक्रवार 24 रोजी सायंकाळी पत्रकार परिषदे घेऊन हा इशारा दिला. ते म्हणाले 23 रोजी जिल्हापरिषद निवडणुकीचा निकाल लागला. हुतात्मा गटाचे कार्यकर्ते आनंदात विरोधी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार भोसले यांच्या घरापासून बरेच लांब अंतरावर अक्षय खवरे, अमोल मुळीक, धनाजी मुळीक आदी कार्यकर्ते गाडीवरुन निघाले असता. भोलसेंचे पती विक्रम भोसले यांनी अमोल मुळीक याला मारहाण केली. अक्षय खवरेवर गोळी झाडली, हवेत गोळी झाडली, त्यामुळे हुतात्माचे अन्य कार्यकर्ते जमावाने तेथे आले. भोसलेंच्या बोगस व बेकायदेशीर रिव्हाल्वर मधील गोळ्या संपल्याने त्यांनी मागे घराकडे धाव घेतली. त्यावेळी मोठय़ा संख्येने हुतात्माचे कार्यकर्ते रागाने भोसलेंच्या घरावर चालून गेले. त्यावेळी स्वतः मी गौरव नायकवडी आणि अन्य कार्यकर्ते यांनी प्रक्षुब्ध जमावाला पांगवले म्हणून अनर्थ टळला. जखमी खवरे-मुळीक युवकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. असे असताना पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करणेसाठी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला व पोलीस स्टेशनमध्ये बसून खोटा गुन्हा नोंद करायला लावला. जेव्हा घटना घडली, जमावाला पांगावले गेले तेव्हा आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शेख व स्टाफही तेथे होता. पोलिसांनी मग खोटी फिर्याद का घेतली. त्यांच्यावर कोणी राष्ट्रवादी वकील नेत्यांनी दबाव टाकला का? ही बाब देखील पुढे यावी. खोटी नावे गुह्यातून वगळून राष्ट्रवादीचा वादग्रस्त कार्यकर्ता, घटनेस व गोळीबारास जबाबदार कार्यकर्ते यांच्यावर ताबडतोब आष्टा पोलीस व जिल्हा पोलीस प्रमुख शिंदे यांनी कारवाई करावी अशी मागणी वैभव नायकवडी यांनी केला असून तसे न झाल्यास कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही दिला आहे. नायकवडी कुटुंबाला बदनाम करणेसाठी 12 वर्षापुर्वी देखील अशीच घटना घडवली गेली. त्याची आठवण वैभव नायकवडी यांनी पत्रकारांना करुन देत असे वारंवार होते. पोलीस तपास झाला पाहिजे, खोटा गुन्हा नोंद करायला लावणाऱयांवर कारवाई झाली पाहिजे असे आवाहन केले आहे.

Related posts: