|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिचोलीत आज भव्य सिनेमॅटीक नाटक ‘सैराट झालंजी’

डिचोलीत आज भव्य सिनेमॅटीक नाटक ‘सैराट झालंजी’ 

प्रतिनिधी/ डिचोली

कलाकारांची खाण म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेल्या डिचोली महाल आज शनिवारी 25 रोजी आणखीन एक इतिहास घडविण्याच्या दृष्टीने झेप घेणार आहे. गोव्यातील प्रथमच तयार करण्यात आलेला सिनेमॅटीक नाटय़प्रयोग ‘सैराट झालं जी’ चा 40 फुटी भव्य अशा रंगमंचावर भव्य दिव्य असा नाटय़प्रयोग आज शनिवारी रात्री 7.30 वा. सादर केला जाणर आहे. बोर्डेतील एक जेष्ठ नाटय़कलाकार साजू पळ यांच्या संकल्पनेनुसार साकारलेल्या या नाटय़ प्रयोगाला सर्वच थरातून मोठा प्रतिसाद लाभत आहे.

या सिनेमॅटीक ‘सैराट झालं जी’ या नाटकाचा प्रथम प्रयोग गेल्या 2 जाने रोजी बोर्डे वडाकडे येथे वडेश्वराच्या प्रांगणात झाला होता. त्या प्रयोगास सुमारे चार हजारांच्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती लाभली होती.

अनेकांकडून या नाटकाचा पुनप्रयोग व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. ही मागणी उचलून धरताना पुन्हा एकदा पण भव्य दिव्यपणे हे सिनेमॅटीक नाटक सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सागर कला संघ बोर्डतर्फे देवी महामाया मंदिर बांधकामाच्या फंडार्थ हा नाटय़प्रयोग आयोजित करण्यात आला असून त्यात मोठा प्रतिसाद लाभला आहे. लोकांनी ही संकल्पाना उचलून धरताना नाटकास हातभार लावलेला आहे. या सिनेमॅटीक कोकणी नाटकात प्रत्यक्ष रंगमंचावर 52 कलाकारांच्या भूमिका दिसून येणार आहेत. तर या नाटकाचा करण्यात आलेल्या काही भागांच्या शुटींगमध्ये सुमारे 150 कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे. बोर्डे गावाची एक झिंगाट लव्ह स्टोरी असे उपशिर्षक जोडलेले असल्याने या सिनेमॅटीक नाटकातील बोर्डे व डिचोली या परिसरात जास्त प्रसंग शुट करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे नाटक पाहताना आपल्याला आपल्या गावातील स्थळांवरील दृष्ये पहायला आनंद मिळतो. आज कराटेची मळी येथे होणाऱया या भव्य अशा नाटय़प्रयोगात रंगमंचावर 20 X 10 फुट आकाराची एलईडी क्रीन व बसविली जाणार आहे. तसेच विशेष एलईडी प्रकाश योजना व ध्वनी योजना करण्यात आली आहे.

 या नाटकातील परशा व अर्चीच्या प्रमुख भूमिकेत शुभम पळ (बोर्डे-डिचोली) व प्रितम गावकर (गावकरवाडा-डिचोली) हे उद्योन्मुख युवा कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. तसेच इतर सर्व प्रमुख व सह कलाकारांनी जिव ओतून या नाटकासाठी आपले योगदान दिलेले आहे. या नाटकाचे लेखक साजू पळ व निमीषा साजू पळ, दिग्दर्शक स्वत: साजू पळ आहेत. सूत्रधार शिवानंद पळ, पार्श्वसंगीत जवाहर बर्वे यांचे आहे. तर तांत्रिक दिग्दर्शन पांडुरंग परब यांनी दिले आहे. व्हिडीओग्राफी स्पीरीटतर्फे ध्वनी व प्रकाश योजना फुलारी डेकोरेटर यांची आहे. तर निर्मिती सहाय्यक भिमाकर पळ, सुरज पळ, विजय बोर्डेकर, राघू पळ, दुर्गेश पळ यांनी दिलेले आहे.