|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुलतानपूर येथील तरुणाजवळून 600 ग्रॅम गांजा जप्त

सुलतानपूर येथील तरुणाजवळून 600 ग्रॅम गांजा जप्त 

प्रतिनिधी/ बेळगाव

सुलतानपूर (ता. रायबाग) येथील एका तरुणाला अटक करुन त्याच्या जवळून 600 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. शुक्रवारी दुपारी एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली. महाविद्यालयीन तरुणांना गांजा विकताना त्याला अटक झाली आहे.

धऱयाप्पा गजानन दोडमनी (वय 23, रा. सुलतानपूर) असे त्याचे नाव आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीरची व त्यांच्या सहकाऱयांनी सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीच्या भिंतीजवळ ही कारवाई केली. धऱयाप्पा हा मुळचा रायबाग तालुक्मयातील असला तरी गांजा विकण्यासाठी सध्या तो बेळगावात राहत होता.

महाविद्यालयीन तरुणांना गांजा विकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी धऱयाप्पाला अटक केले. त्याने बेळगावात एक खोलीही केली आहे. विद्यार्थ्यांना गांजाच्या पुडय़ा पोहोचविण्याचे काम तो करीत होता. बेळगाव येथे उच्च शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी त्याचे ग्राहक बनले होते.

याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रजून धऱयाप्पाला अटक केली. अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रात्री उशीरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. धऱयाप्पा गांजा कोठून आणत होता याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Related posts: