|Monday, August 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » फेसबुक लाईव्हसोबत रंगला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?

फेसबुक लाईव्हसोबत रंगला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? 

प्रेक्षकांची बदलती अभिरुची लक्षात घेत अभिनव संकल्पना राबवण्याचा प्रयत्न झी टॉकीजने नेहमीच केला आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांच्या मनातील हे स्थान अधिक दृढ व्हावं यासाठी कलाकारांसोबत फेसबुक लाइव्ह चॅटची कल्पना यंदाच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या पुरस्कार सोहळ्यात झी टॉकीजतर्पे ठेवण्यात आली होती. फेसबुक इंडियाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्यात फेसबुक लाइव्ह चॅटची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणणारी झी टॉकीज ही पहिलीच मराठी वाहिनी आहे.

या फेसबुक लाइव्ह चॅटला प्रेक्षकांनीसुद्धा तितकाच दमदार प्रतिसाद दिला. एका दिवसात या फेसबुक लाइव्ह चॅटला लाखाहून अधिक ह्यूज मिळाले. आपल्या आवडत्या कलाकारांसोबत ‘याचि देहि याचि डोळा’ संवाद साधण्याच्या या संधीने प्रेक्षकांचीही मने जिंकून घेतली. महेश मांजरेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, पुष्कर क्षोत्री, वर्षा उसगांवकर, सई ताम्हणकर, अमफता खानविलकर, केतकी माटेगावकर, हृषिकेश रानडे, अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी आणि सैराट फेम आकाश ठोसर, रिंकू राजगुरू या कलाकारांनी आपल्या चाहत्यांसोबत लाइव्ह चॅटवरून संवाद साधत प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर दिली. प्रेक्षकांनीही कलाकारांना पुरस्कार विजयासाठी मनरू पूर्वक शुभेच्छा दिल्या. हे सगळे व्हिडिओज् झी टॉकीजच्या फेसबुक पेजवर पाहता येतील. कलाकारांच्या बहारदार परफॉमन्सनी यंदाचा सोहळा चांगलाच रंगला. या सोहळ्याचा आस्वाद लवकरच झी टॉकीजवर प्रेक्षकांना घेता येईल.