|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » केशवसूत स्मारकाला ‘कोकणातील लेखकांची’ लाखमोलाची पुस्तके भेट

केशवसूत स्मारकाला ‘कोकणातील लेखकांची’ लाखमोलाची पुस्तके भेट 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

‘बुक गंगा डॉट कॉम’चे सर्वेसर्वा मंदार जोगळेकर यांनी बहुसंख्येने मराठी पुस्तके इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन जगभर नेली. कवी केशवसूत स्मारकाला त्यांनी दोन महिन्यांपूर्वी कार्यक्रमादरम्यान भेट दिली असता 1 लाखांची पुस्तके स्मारकाला भेट देण्याचे जाहीर केले होते. कवी केशवसूत स्मारकात ‘तुतारी शिल्प’ अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने जोगळेकर यांनी कोकणातील साहित्यिकांची 1 लाखाहून अधिक किंमतीची 600 पुस्तके भेट देऊन आपला वायदा पूर्ण केला आहे.

‘पुस्तकांचे गाव’ अशी परदेशात असलेली संकल्पना शासनाकडून महाराष्ट्रात राबवण्याची घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापही ती सत्यात उतरलेली नाही. शासनाच्या या निर्णयाचे कौतुक आहे, मात्र ती सत्यात उतरण्याची वाट पहाण्यापेक्षा लोकसहभागातून आपण ती पूर्ण करूया, अशी धारणा मंदार जोगळेकर यांनी व्यक्त केली. त्याचाच शुभारंभ म्हणून त्यांनी केशवसूत स्मारकाला 1 लाख रूपयांहून अधिक पुस्तकांची भेट दिली आहे. अशाच प्रकारे इतरांनीही पुढे येऊन ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना साकारूया, असा संदेश त्यांनी दिला आहे.

पुस्तके कोणती देण्यात यावी, असा प्रश्न जेव्हा त्यांच्यासमोर आला तेव्हा त्यांनी कोकणातील लेखकांची पुस्तके यात द्यावीत, असा विचार पुढे आला. तो केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर यांनाही आवडला. त्यानुसार आता केशवसूत स्मारकातील ग्रंथसंपदेत कोकणातील लेखकांच्या 600 पुस्तकांची भर पडली आहे. यामध्ये दिग्गज लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

‘विश्वकोष’ आजपासून पेनड्राईव्हमध्ये

मंदार जोगळेकर यांनी ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या माध्यमातून मराठीतील अनेक पुस्तके ऑनलाईन स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. अशाच प्रकारे एक वेगळी संकल्पना ते वाचकांसमोर घेऊन येत आहेत. विश्वकोषाचे 20 ही खंड ते आता ते पेनड्राईव्हमध्ये उपलब्ध करून देत आहेत. याचा शुभारंभ सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा †िदिनानिमित्ताने शासनातर्फे मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला होणाऱया कार्यक्रमात होणार आहे. ही नवी पेनड्राईव्ह संकल्पना स्पर्धा परीक्षांच्या मुलांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बुकगंगाच्या वेबसाईटवर संपर्क साधला, असता हा पेनड्राईव्ह उपलब्ध होऊ शकतो.।,

Related posts: