|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ

शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ 

माळी गल्ली, मठ गल्लीत आठवडय़ाभरात 3 दुचाकी चोरल्या

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर व उपनगरात मोटारसायकली चोरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. माळी गल्ली व मठ गल्ली परिसरात आठवडय़ाभरात तीन दुचाकी चोरण्यात आल्या असून घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनातील पेट्रोल चोरण्याबरोबरच मोटार सायकली पळविण्याचे प्रकारही वाढले आहेत.

माळी गल्ली येथील गंगू गोपन यांनी शुक्रवारी रात्री आपल्या घरासमोर केए 22 ईटी 3105 क्रमांकाची डिव्हो आपल्या घरासमोर उभी केली होती. शनिवारी सकाळी या दुचाकीची चोरी झाल्याचे उघडकीस आले. यासंबंधी गंगू यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

24 फेब्रुवारी रोजी मठ गल्ली येथून आणखी एक डिव्हो चोरीला गेली आहे. त्या आधी पाच दिवसांपूर्वी माळी गल्ली येथे घरासमोर उभी करण्यात आलेली होंडा ऍक्टीव्हा चोरीला गेली आहे. या सर्व वाहन मालकांनी मार्केट पोलिसांना या संबंधी माहिती दिली आहे. बिनतारी यंत्रणेवरुन शहरातील सर्व पोलीस स्थानकांना ही माहिती देण्यात आली आहे.

उपनगरात घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकलांतून पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले आहेत. समृद्धीकॉलनी वडगाव येथे शनिवारी रात्री दर्शन गायकवाड यांच्या घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकलीतून पेट्रोल चोरताना नागरिकांनी पाठलाग केल्याने दोन तरुण आपली मोटारसायकल तेथेच सोडून पळाले होते.

पेट्रोल चोरण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारसायकलवर क्रमांक लिहिलेला नव्हता. टिळकवाडी पोलिसांनी ती मोटार सायकल ताब्यात घेतली असून संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. पेट्रोल चोरी बरोबरच आता दुचाकी चोरीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांत खळबळ माजली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.

Related posts: