|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वेतनासाठी महापालिका कर्मचाऱयांकडून निषेध

वेतनासाठी महापालिका कर्मचाऱयांकडून निषेध 

वार्ताहर/ सोलापूर

सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱयांना वेळेवर वेतन मिळाले नाही. थकीत वेतन त्वरित मिळावे या मागणीकरिता महापालिका कर्मचाऱयांनी काल (सोमवारी) आंदोलन करीत काळय़ा फिती लावून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला?. महापालिका कामगार संघटना व महामानव डॉ? बाबासाहेब आंबेडकर टेड युनियनच्यावतीने वेतनासाठी आंदोलन करण्यात आले .    

     सोलापूर महानगरपालिकेची निवडणुक पार पडली. संपूर्ण जानेवारी महिना हा निवडणुक कामातच गेला? निवडणुका कामात कोणताही हलगर्जीपणा न करता दिवसरात्र काम करून महापालिका निवडणुक पार पाडल्या? मात्र फेब्रुवारी महिना संपत आला तरी जानेवारी महिन्याचा पगार मिळाला नाही?. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱयांनी सोमवारी अचानक आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले? येत्या दोन दिवसात वेतन मिळाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले? यावेळी महापालिका प्रशासनास संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले?.

    गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने     ( कमचार्यांनी ) दिवसरात्र काम केले. संपूर्ण फेब्रुवारी महिना आपल्या आर्थिक अडचणींना टाळून काम केले . म्हणून प्रशासन प्रमुखांनी लक्ष देऊन त्वरित वेतन कराचे अशी मागणी संघटनेने केली आहे.