|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » क्रीडा प्रबोधिनीसाठी आज अंतिम चाचणी

क्रीडा प्रबोधिनीसाठी आज अंतिम चाचणी 

 प्रतिनिधी / सातारा

क्रीडा प्रबोधिनी निवड चाचणी साताऱयात शाहू क्रीडा संकुलात दोन सत्रात पार पडली. अंतिम निवड चाचणी मंगळवारी होणार आहे. यामध्ये जिह्यातून 290 खेळाडू सहभागी झाले आहेत.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा प्रबोधिनीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय चाचणी स्पर्धा सुरु आहे. या चाचणी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांच्या हस्ते व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास कुल्हाळ, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, समन्वयक भांगे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिह्यातील 11 तालुक्यातील शिक्षकही हजर होते. त्यामध्ये वजन, उंची यांची मोजमापे घेवून शारिरीक दृष्टय़ा सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांनाच यामध्ये सहभागी करुन तालुकापातळीवर 17 गुण मिळवलेले या चाचणी स्पर्धेसाठी सहभागी झाला होता. जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड केली जाते. राज्यात अकरा क्रीडा प्रबोधिनी असून तेथे त्यांना खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या वर्ष हे केवळ फिटनेस आणि त्या विद्यार्थ्यांला कोणता खेळ आवडतो त्यावरुन त्याची त्या खेळासाठी निवड केली जाते, असे जिल्हा क्रीडाधिकारी पाटील यांनी सांगितले.

वैद्यकीय सेवा नव्हती

11 तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी या चाचणीसाठी आले होते. काही विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने त्रास जाणवला. पालकांनी मात्र वैद्यकीय सेवा  नसल्याची यावेळी खदखद व्यक्त केली.

Related posts: