|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महावितरणचा कर्मचारी थोडक्यात बचावला

महावितरणचा कर्मचारी थोडक्यात बचावला 

प्रतिनिधी / गोडोली

येथील साईबाबा मंदिराजवळ दुरूस्ती करण्यासाठी पोलवर चढलेला महावतिरणचा कर्मचारी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तब्बल 20 फूटावरून खाली पडला. सकाळी 10 वाजता घडलेल्या या प्रसंगात एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्युत प्रवाह बंद करून दुरूस्त करत असताना पुन्हा विद्युत प्रवाह सुरू झाला. याबाबत महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका कर्मचाऱयाचा जीव गेला असता. आयुष्याची दोर बळकट असल्याने काळ आला असतानाही महावितरणचा तो कर्मचारी बचावला.

मंगळवार हा दिवस महावितरणचा दुरूस्ती करण्याचा दिवस असतो.  शहरात असेचे एक दुरूस्तीचे काम गोडोलीतील साईबाबा मंदिरालगत सुरू होते. कामापुर्वी विद्युत प्रवाह बंद करून सकाळी 10 वाजता पोलवर कामासाठी महावितरणचा एक कर्मचारी पोलवर चढत होता. तर दुसरा खाली मदतीसाठी उभा होता. वरती चढलेल्या कर्मचाऱयाने वायरला हात लावताच त्याला जोरदार शॉक बसला. तो वरून 20 फूट खाली फेकला गेला. यावेळी त्याचे कपडे फाटून हातापायाला चांगलाच मुका मार लागला. यावेळी स्थानिक नागरिक असलेले महावितरणचे सेवा निवृत्त कर्मचारी एकनाथ संकपाळ यांनी प्रसंगावधान ओळखून त्या कर्मचाऱयाला तात्काळ मदत केली.  तसेच त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनाही कळवले.

महावितरणचे शाखा अभियंता धनाजी सावंत म्हणाले, ‘तो कर्मचारी किरकोळ जखमी असून त्याला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. मात्र या  घटनेची माहिती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.      

 

Related posts: