|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अवैध वाळू वाहतूक करणारे 8 ट्रक पकडले

अवैध वाळू वाहतूक करणारे 8 ट्रक पकडले 

प्रतिनिधी / वाई

वाई महसूल खात्याच्यावतीने मंगळवारी पहाटे 7 वाजता अवैध वाळू वाहतूक करणारे 8 ट्रक पकडण्यात आले. यावेळी 30 ते 32 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. तसेच सुमारे 8 लाखांचा दंड त्यांच्याकडून वसुल करण्याची कारवाई सुरू आहे. तहसिलदार अतुल म्हेत्रे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाई-पाचवड रस्त्यावर वाकेश्वरनजीक कृष्णाकाट हॉटेलजवळ जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये व उपविभागीय अधिकारी स् अस्मिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 वाजता तहसिलदार अतुल म्हेत्रे व सहकार्यांनी 8 ट्रक पकडले. यावेळी ट्रक क्र. एम. एच. 11 ए.बी. 4525, एम. एच. 11 ए.बी. 3429, एम. एच. 11 बी.एल.2988, एम. एच. 11 बी.पी. 1900, एम.एच. 11 4723, एम. एच. 11 बी.एल. 7274, एम. एच. 11 बी.एल. 6247, एम. एच. 11 बी.के. 3429 या आठ ट्रकमधून  सुमारे 30 ते 32 ब्रास वाळू विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती. पोलीस कर्मचार्यांच्या सहकार्याने सर्व ट्रक ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे 8 लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.  

या मोहिमेत नायब तहसिलदार दीपक सोनावणे, सुरेश पिसाळ, मंडलाधिकारी एन. जे. गायकवाड, बी. पी. इंगळे, बी. एल. जाधव, पी. जी. झुंजार, एन. जे. इथापे, एन. एस. भांदीर्गे, पोलीस हवालदार खाडे यांनी सहभाग घेतला.

 

Related posts: