|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राज्यातील 148 शहरांमध्ये आजपासून स्वच्छ भारत अभियान

राज्यातील 148 शहरांमध्ये आजपासून स्वच्छ भारत अभियान 

प्रतिनिधी / खंडाळा

महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 148 शहरांमध्ये बुधवार 1 मार्चला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली.

रायगड जिह्यातील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदांडा, ता. अलिबाग यांच्या यांच्या सौजन्याने स्वच्छता मोहीम 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून राबविण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियानचे’ महामहिम राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्र सरकारने 26 जानेवारीला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने गेली अनेक वर्ष व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबविन्यात येत असून 16 नोव्हेंबर 2014 रोजीच्या स्वच्छता अभियानची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.

1 मार्चला हे अभियान महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यातील 148 शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राखविली जात आहे. सर्व शहरातील 1434 सरकारी कार्यालये, 115 रेल्वे स्टेशन व सुमारे 2720 कि मी. लांबीचे शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बसस्थानके व रुग्णालये या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. हे अभियान अंमलात आणताना प्रशासनाच्या सहकार्याने परंतु कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

हात मौजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्यासाठी साहीत्य प्रतिष्ठानच्या वतीने पुरविण्यात येणार आहे. तर जमा केलेला कचरा सरकारी अथवा खासगी वाहनातून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या अभियानास प्रोत्साहन देण्यासाठी  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी , सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत.

प्रतिष्ठानमार्फत अधिकाऱयांना सहकार्याबाबत विनंती

सातारा : हे संपूर्ण अभियान अंमलात आणताना प्रशासनाच्या सहकार्याने परंतु कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानमार्फत पुरविण्यात येणार आहे. जमा केलेला कचरा सरकारी अथवा खासगी वाहनातून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या अभियानातर्फे प्रतिष्ठानमार्फत संबधित अधिकाऱयांना सहकार्याबाबत विनंती पत्रे दिलेली आहेत.

 

 

 

 

 

Related posts: