|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नाटमहोत्सवाची सांगता ‘सं. सुर्वणतुला’ या नाटकाने

नाटमहोत्सवाची सांगता ‘सं. सुर्वणतुला’ या नाटकाने 

प्रतिनिधी/ पणजी

गेली काही दिवस कला अकादमी, पणजी येथे सुरु असलेल्या स्व. पं. तुकाराम फोंडेकर स्मृती संगीत नाटय़महोत्सवाची सांगता ‘सं. सुवर्णतुला’ या नाटकाने झाली. या नाटय़महोत्सवात विविध संस्थानी आपली नाटके सादर केली. आजवर अजमावर झालेली नाटके या नाटय़महोत्सवात या संस्थानी सादर केली. एकूण 9 संस्थानी या नाटय़महोत्सवात सहभागी घेतला होता. या संपूर्ण नाटय़महोत्सवा दरम्यान नाटय़प्रेमींनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावरुन संगीत नाटकाची परंपरा राज्यात रुजू लागली आहे हे दिसून येते.

rयावेळी नीरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला शिवराय फोंडेकर, कला अकादमीचे अध्यक्ष दौलत हवालदार, व सदस्य सचिव प्रसाद लोयलेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात नाटय़महोत्सवात आपल्या नाटकाद्वारे आपला वेगळा ठसा उमठविणाऱया कलाकारांचा सन्मान करण्यात आला. प्रदिप वेर्णेकर व दुर्गाकुमार नावती यांनी या नाटमहोत्सवाचे निरीक्षन केले.

 सन्मानार्थी कलाकारांची नावेः

उत्कृष्ट नवीन संहिता-आपा बाबलो गावकर(नाटक- सं. करवीर सौदामिनी), उत्कृष्ट गायक कलाकार पुरुष- दशरथ नाईक(नाटक- सं. गोमंतसंत सोहिरोबानाथ), उत्कृष्ट गायक कलाकार महिला-श्रध्दा जोशी(नाटक-सं. एकच प्याला), उत्कृष्ट ऑर्गन साथीदार-प्रदिप शिलकर(सं. ययाती आणि देवयानी), व उत्कृष्ट तबला साथीदार-दयानंद कांदोळकर(नाटक-सं. परब्रह्म आले भेटी)

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला अकादमीचे कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर यांनी केले. वरील सर्व सन्मानार्थी कलाकारांना मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानीत करण्यात आले.

Related posts: