|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बारावीच्या परीक्षा आजपासून

बारावीच्या परीक्षा आजपासून 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची (एचएससी) परीक्षा बुधवार 1 मार्चपासून सुरू होत असून ती 22 मार्चपर्यंत चालणार आहे.

विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसायिक अभ्यासक्रम अशा चारही शाखांमधून विविध विषयांची परीक्षा त्यात सामाविष्ठ असून एकूण 16 केंद्रामधून ती घेतली जाणार आहे. सुमारे 16000 विद्यार्थी या परीक्षेस बसणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षेला बसणऱया सर्व विद्यर्थ्यांना प्रवेशपत्र (हॉल तिकिट) देण्यात आले असून ते सादर केल्यानंतरच परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

सकाळी 10 ते दुपारी 12.30 अशी परीक्षेची वेळ असून प्रवेश पत्रावर तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांचे त्यांनी पालन करावे, असे मंडळाने कळविले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहेत. त्यावर आधारित नीट व इतर परीक्षा बारावीचे विद्यार्थी देणार आहेत. दरम्यान, दहावीची परीक्षा 1 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

 

 

 

 

Related posts: