|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » कोब्राच्या दंशाने सर्पमित्राचा मृत्यू

कोब्राच्या दंशाने सर्पमित्राचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नायगाव परिसरात राहणाऱया सर्पमित्राचा कोब्राच्या दंशाने मृत्यू झाला आहे. मोहम्मद अवेझ मिस्त्राr असे त्यांचे नाव आहे. श्रमसाफल्य इमारतीत साप दिसल्याचे कळवल्यानंतर त्याला पकडण्यासाठी अवेझ गेला होता. मात्र कोब्राला पकडत असताना त्याने अवेझज्या हातावर चावा घेतला. यानंतरही अवेझने त्याला पकडण्याजा प्रयत्न सुरू ठेवला आणि गोणीत भरले.

अवेझ गोणी पाठिवर घेऊन जात असताना कोब्राने त्याच्या पाठीवरही चावा घेतला. सराईत असलेल्या अवेझने यानंतरही संयम ठेवत त्याला पकडू
न ठेवले आणि खाडीत सोडून दिले. यानंतर अवेझने उपचारासाठी रूग्णालयात धाव घेतली, मात्र तोपर्यंत अषर झाला होता. कोब्राच्या दंशाने त्याच्या शारीरात 90 टक्के विष पसरले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.