|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सदाशिवगडावर दुर्गपूजन उत्साहात

सदाशिवगडावर दुर्गपूजन उत्साहात 

वार्ताहर/ कराड

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांची साक्ष देणाऱया राज्यासह देशभरातील गडकोटांची संस्कृती जपली जावी यासाठी सुभा महाराष्ट्र दुर्ग संवर्धन संघ व शिवाजी ट्रेल संस्थेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या दुर्ग पुजन कार्यक्रमांतर्गत कराड तालुक्यातील ऐतिहासिक सदाशिवगडाच्या पठारावर दुर्गपूजनाच कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला.

यावेळी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाषराव एरम, रश्मी एरम, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, उपाध्यक्ष कृष्णत काळे,हजारमाची ग्रामपंचायतीचे सदस्य सतीश जांभळे, राहुल जाधव, अजित पाठक, अमित ताटे, सागर जाधव उपस्थित होते.

डॉ. सुभाषराव एरम म्हणाले, छत्रपती शिवरायांनी ज्या गडकोटांच्या साक्षीने स्वराज्याची निर्मिती केली ते गडकोट आजही शिवरायांच्या प्रतापाची साक्ष देत उभा आहेत. मात्र, ज्या गडकोटांनी आपले रक्षण केले. त्या गडकोटांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे.समाजात काम करणाऱया प्रत्येकाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱया गडकोटांच्या संरक्षणासोठी पुढे येण्याची गरज आहे.राज्यासह देशभरातील त्या त्या गडकोटांच्या परीसरातील तरूणांनी गडांच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.जेणेकरूण आपल्या पुढच्या पिढयांना शिवरायांच्या पराक्रमांची साक्ष देणारे गडकोट अनुभवयास मिळतील, असे  डॉ.एरम यांनी सांगितले.

डॉ. योगेश कुंभार म्हणाले, शासनाच्या निधिची वाट न बघता गडप्रेमी व भाविकांच्या माध्यमातून सदाशिवगडाच्या विकासाची कामे सुरू आहेत.पायथ्यापासुन पठारापर्यंत जाणाऱया पायरीमार्गाच्या दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात आले आहे.तर धोकादायक वळणावरती संरक्षक पाईपही बसवण्यात आल्या आहेत. गडप्रेमींच्या माध्यमातुन सदाशिवगडावर वृक्ष लागवड व संवर्धनाची चळवळ राबवण्यात येत आहे.सदाशिवगडाच्या संवर्धनासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे अवाहन डॉ. योगेश कुंभार यांनी केले. 

Related posts: